प्राचार्य संदेश


प्राचार्य डॉ.भूषण वसंतराव कर्डिले
"बी.एड. प्रशिक्षण हा केवळ एक कार्यक्रम नसून ते एक व्रत आहे. छात्राध्यापाकांनी त्यांचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठीचा हा एक उपक्रम आहे. त्यांना विविध अध्यापन पद्धती, स्वयंनित्य अध्ययन आणि शालेय विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र समजून घेण्यासाठी काही कौशल्य साध्य करावी लागतात . विषयाच्या अनुषंगाने तज्ज्ञता येण्यासाठी सतत अभ्यासाचा ध्यास आणि अध्यापन व्यवसायाप्रती निष्ठा बाणावी लागते. या अध्यापन व्यवसायाच्या विकासासाठी संशोधनात्मक दृष्टी आणि वृत्ती तसेच शालेय जबाबदाऱ्यांचा मेळ साधावा लागतो. त्यानुषंगे आमच्या महाविद्यालयात छात्राध्यापाकांमध्ये विश्लेषण करण्याची क्षमता, संभाषण कौशल्ये आणि सकारात्मकतेचा विचार रोवण्यासाठी पावले उचलली जातात.आमच्या बी.एड. शिक्षणक्रमाची यशस्वी परिपूर्णता म्हणजेच उद्योजकतेच्या दृष्टीने हे पाऊल होय.

News

प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

State Level Seminar.Friday,29-Dec-2017


Videos