के .के . वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालय,नाशिक.

शिक्षण प्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करून गरजू प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यासाठी इ.स.२००८ मध्ये के .के . वाघ शिक्षण संस्थेने नाशिक शहराच्या मध्यवर्ती स्थानी महाविद्यालयाची स्थापना केली. आजमितीला महाविद्यालयात एन.सी.टी.ई. भोपाल आणि सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार ५० विद्यार्थ्याच्या दोन तुकडीसाठी प्रशिक्षण देण्याचे कार्य चालू आहे. भविष्यात प्राथमिक शिक्षकांसाठी डी.एड तसेच पदव्युतर प्रशिक्षणासाठी एम.एड., एकात्मिक बी.ए.बी.एड., बी.कॉम.बी.एड., बी.एस्सी.बी.एड.,चे वर्गही सुरु करण्याचा तसेच येत्या काळात संशोधनसंस्था म्हणून नावारूपास आणण्याचा संस्थेचा मानस आहे. महाविद्यालय नुकतेच सुरु झाले तरीही येथे प्रशिक्षणार्थीसाठी सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष,मानसशास्त्रीयप्रयोगशाळा अशा विविध सोई उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत व संपुर्णतेत कसलीही तडजोड न करण्याच्या संस्थेच्या ब्रीदानुसार प्रशिक्षण दिले जात आहे. याची चाचणी विद्यापीठाच्या विविध समित्यांद्वारे करण्यात आलेली आहे. अनेक मा.मार्गदर्शक आणि तज्ज्ञ व्यक्तींनी याबाबत महाविद्यालयास उत्तम दर्जाचे सहकार्य देऊन महाविद्यालयाचा लौकीक वाढेल यासाठी अनमोल मदत केली आहे आणि सातत्याने करीत आहे. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर सेवक वर्ग हा अनुभवी व सेवाभावी असल्यामुळे तसेच सर्वजण संघभावनेने काम करीत असल्यामुळे इतर महाविद्यालायाप्रमाणे सुरुवातीच्या काही वर्षात येणाऱ्या अडचणींना महाविद्यालयाला तोंड द्यावे लागले नाही.

शिक्षक - प्रशिक्षणाची उद्दिष्टे :-

  1. भारतीय संविधानाच्या राष्ट्रीय मुल्ये व ध्येयायाबाबत क्षमतांची जोपासना करणे .
  2. आधुनिकीकरण आणि समाज परिवर्तनाचा अभियंता म्हणून कार्य करणे.
  3. आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि मानवी हक्कांची संरक्षण तसेच बालकांच्या हक्कांचे संरक्षण तसेच बालकांच्या हक्कांसंदर्भात जाणीव जागृतीचे प्रयत्न करणे.
  4. शिक्षिकी पेशातील विविध क्षमता आणि बांधिलकीच्या संदर्भात कार्य कुशलतेचे आखणी करणे
  5. परिणामकारक शिक्षक घडविण्यासाठी विविध कौशल्ये व क्षमतांचा उपयोग करणे.
  6. पर्यावरण , लोकसंख्या, लिंग समानता आणि कायदेशीर माहितीचे ज्ञानहे उदयोन्मुख भारतीय समाजाच्या जडणघडणच्या दृष्टीने भावनाशील अशा विद्यार्थी शिक्षक घडविणे.
  7. शालेय विद्यार्थ्यांप्रती वैज्ञानिक व निकाषांत्मक विचारप्रकीया घडविणे.
  8. विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक तसेच सामाजिक अशा वास्तव बाबी संदर्भात समीक्षात्मक / टीकात्मक जाणीवजागृती करणे.
  9. संघटनात्मक व व्यवस्थापकीय कौशल्यांचा उपयोग करणे.
  10. समाजाला व शाळेला अपेक्षित असा शिक्षक घडवून देणे .

News

प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

State Level Seminar.Friday,29-Dec-2017


Videos